डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गृहमंत्री अमित शहा प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले. त्रिवेणीसंगमावर स्नान केल्यानंतर ते पुरी आणि द्वारका इथल्या शंकराचार्यांची तसंच इतर संतांची भेट घेणार आहेत.

 

दरम्यान, परवा २९ तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्याता लक्षात घेऊन महाकुंभ मेळा क्षेत्रात  वाहन प्रवेशाला बंदी  आहे. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जास्त गर्दी असलेल्या भागात जलद प्रतिसाद पथकं तैनात करण्यात आली आहेत.

 

महाकुंभ मेळ्याचं औचित्य साधून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं महिला सक्षमीकरण आणि महिलांचे अधिकार याविषयी जनजागृती करणारी दालनं उभारली आहेत. याबरोबरच देशभरातल्या कलाकारांनी तयार केलेली हस्तकला, विविध कलाकृती असलेली वस्त्र, जैविक उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत.