डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू-काश्मीरमधल्या युवा पिढीशी केंद्रीय गृहमंत्र्यांचा संवाद

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी काल वतन को जानो या कार्यक्रमाअंतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या युवा पिढीशी संवाद साधला. जम्मू आणि काश्मीरमधले २५० महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी नवी दिल्लीत आले आहेत. कलम ३७० रद्द करुन केंद्र सरकारनं देश एकसंध केला असून आता जम्मू काश्मीरमधल्या जनतेला देशातल्या अन्य राज्यांमधल्या नागरिकांप्रमाणेच सगळे अधिकार मिळतील असं शहा म्हणाले. या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात गेल्यानंतर आपल्या कुटुंबियांशी, नातेवाईकांशी शांतता, सलोखा आणि विकासाबाबत चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं. हा देश प्रत्येक नागरिकाचा आहे आणि हा विश्वास जम्मू काश्मीरमधल्या लोकांमध्ये रुजवणं महत्त्वाचं असल्याचं शहा म्हणाले.