केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रांची इथं 27 व्या पूर्व विभागीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या बैठकीत झारखंड, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या चार पूर्वेकडील राज्यांतील 70 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील प्रलंबित आंतरराज्यीय मुद्द्यांवर चर्चा आणि मागील परिषदेच्या बैठकींमध्ये घेतलेल्या निर्णयांवरील प्रगतीचा आढावा घेतला जाईल. राज्य सरकारने 20 हून अधिक मुद्यांची कार्यसूची तयार केली आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून किमान सव्वा लाख कोटी रुपयांच्या प्रलंबित थकबाकीची मागणीचा समावेश आहे. बिहारसोबत मालमत्ता आणि विविध दायित्वांचं वाटप आणि पश्चिम बंगालसोबत पाणी वाटप या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Site Admin | July 10, 2025 9:14 AM | Minister Amit Shah
पूर्व विभागीय परिषदेची गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
