डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ग्रामीण भागाला समृद्ध बनवण्यासाठी दुग्धोत्पादनाचं मोठं योगदान – मंत्री अमित शाह

दुग्धोत्पादन क्षेत्र देशाच्या विकासाला गती देत असून ग्रामीण भागाला समृद्ध बनवण्यासाठी दुग्धोत्पादन क्षेत्राचं मोठं योगदान असल्याचं मत केंद्रीय गृृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं ‘दुग्धोत्पादन क्षेत्रात शाश्वतता आणि वितरण क्षमता’ या विषयावर आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन केलं. श्वेतक्रांती २ च्या दिशेनं देश वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले. गावाकडून शहरांकडे होणारं स्थलांतर रोखण्यासाठी छोट्या शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं गरजेचं असून त्यासाठी दुग्धोत्पादन क्षेत्र हा एकमेव उपाय असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यशाळेदरम्यान, अनेक राज्यांमध्ये बायोगॅस संयंत्रांच्या स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आले.