दक्षिण आफ्रिकेतल्या खाणदुर्घटनेत किमान शंभर जणांचा मृत्यू

दक्षिण आफ्रिकेतल्या खाणदुर्घटनेत जमिनीखाली खोलवर अडकून किमान शंभरजणांचा  मृत्यू झाल्याचं  समोर आलं आहे. नॉर्थ वेस्ट परगण्यात असलेल्या या खाणीतल्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये सुटका आणि बचाव कार्य सुरु केलं होतं. सुटका झालेल्यांपैकी एकाच्या सेलफोनमध्ये खाणीत खोलवर गाडल्या गेलेल्या मृतदेहांचे फोटो असल्याचं आढळून आलं. त्यामुळे पोलिसांनी नव्याने शोधकार्य सुरु केलं.  त्यानंतर अठरा मृतदेह काढण्यात आले आहेत. हे लोक अवैधरित्या खाणीत उतरले असावेत असा अंदाज आहे.