May 19, 2025 8:08 PM

printer

सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार – कृषीमंत्री

सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यामुळे राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची मत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. देशभरातल्या विविध शेतकरी संघटनांची नवी दिल्लीत आज बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.  

 

या कराराला स्थगिती देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक होता असं सांगत भविष्यात या पाण्याचा योग्य उपयोग करून त्याचा व्यापक प्रमाणात लाभ करून देण्यासाठी विचार करू असं चौहान म्हणाले.