August 31, 2024 9:18 AM

printer

शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवडाभरात दूध अनुदान जमा होईल – पुणे दुग्धविकास आयुक्त प्रशांत मोहोड

राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवडाभरात दूध अनुदान जमा होईल अशी माहिती पुणे दुग्धविकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे. राज्यातल्या सर्व दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर तत्काळ भरावी. राज्य सरकारकडून 256 कोटी रुपये दुग्धविकास विभागाकडे वर्ग झाले आहेत. कागदोपत्री तयारी पूर्ण होताच दूध अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं मोहोड यांनी सांगितले.