गेल्या १० वर्षात देशातल्या दुग्धोत्पादनात ६३ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. १४ कोटी ६० लाख टनांवरुन ते २३ कोटी ९० लाख टनांपर्यंत पोहोचलं आहे. दुग्धोत्पादनाबाबत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जगातल्या एकूण दुग्धोत्पादनापैकी एकचतुर्थांश उत्पादन भारतात होतं. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा वाटा ५ ट्क्के आहे. आणि ८ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यातून थेट रोजगार मिळतो असं केंद्रीय दुग्धव्यवसाय विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. देशात दरडोई दुधाची उपलब्धताही ४८ टक्के वाढली आहे.
Site Admin | September 29, 2025 1:26 PM | Milk Production
गेल्या १० वर्षात दुग्धोत्पादनात वाढ