येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाची विक्री आता 56 वरून 58 रुपये प्रतिलिटर, तर म्हशीच्या दुधाची विक्री 72 वरून 74 प्रतिलिटर रुपये होणार आहे, अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी काल पुण्यात दिली.
Site Admin | March 14, 2025 10:34 AM | milk price hike
दूधाच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या, काय आहेत नवे दर ?
