माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी, दूरदर्शनच्या तसंच पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
अमरावतीमधल्या भारतीय जनसंचार संस्थेची बडनेरा इथली इमारत २ वर्षात पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले. बडनेरा इथल्या प्रस्तावित जागेची त्यांनी पाहणी केली आणि २०२७ चे शैक्षणिक सत्र इथेच सुरू होईल, या दिशेने कामं गतीमान करण्याचे आदेश दिले.