मनोरंजन क्षेत्रातल्या नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध – संजय जाजू

गेमिंग, ऍनिमेशन आणि मनोरंजन क्षेत्रातल्या नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. याचं हेतूने सरकारने आयआयसीटी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजची स्थापना केली आहे, असं ते म्हणाले. हैदराबाद इथं इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्सच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते. आयआयसीटी ही संस्था सार्वजनिक-खासगी प्रारुपानुसार काम करेल. यात ५२ टक्के भागीदारी ही FICCI आणि CII ची तसंच ४८ टक्के भागीदारी सरकारची असेल असं जाजू यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.