डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 4, 2025 7:44 PM

printer

वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडा तर्फे राज्यात 2 लाख झाडांचं रोपण

येत्या एक ते सात जुलै दरम्यान देशात साजरा करण्यात येणाऱ्या वन महोत्सव सप्ताहानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडा तर्फे राज्यात सुमारे दोन लाख झाडांचं रोपण करण्यात येणार आहे. यापैकी सुमारे ५० हजार झाडं मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात लावण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.

 

म्हाडा मुख्यालयात आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते आज बोलत होते. राज्यात छत्रपती संभाजीनगर सह पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या म्हाडाच्या विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातून प्रत्येकी मंडळाने २५ हजार झाडांचं रोपण करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा