October 2, 2024 2:23 PM | mecico

printer

मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून क्लॉडिया शीनबाम यांनी शपथ घेतली

मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून क्लॉडिया शीनबाम यांनी काल शपथ घेतली. याआधीचे राष्ट्रपती आंद्रे मॅन्युअल लोपेज़ ओब्रेडोर यांच्या जागी शीनबाम अध्यक्षपदावर विराजमान झाल्या आहेत. ६२ वर्षीय शीनबाम यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ सहा वर्षांसाठी असेल. स्वतःचा मार्ग स्वतःच शोधणाऱ्या मेक्सिको मधल्या अनेक महिलांच्या प्रतिनिधी म्हणून आपण राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारत असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.