मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पूर्व राजस्थान, झारखंड आणि उत्तरप्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी आज थंडीची लाट राहील, तर तामिळनाडू आणि करैकलमध्ये आज जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राजधानी दिल्ली परिसरात हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं दिल्ली आणि आसपासच्या भागात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा तिसरा टप्पा लागू केला आहे.