November 4, 2024 11:29 AM

printer

पुरुष राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून चेन्नईतील सुरुवात

पुरुषांच्या 14 व्या राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून चेन्नईतील मेयर राधाकृष्णन हॉकी क्रीडांगणावर सुरुवात होत आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 31 संघ सहभागी होत आहेत.

 

साखळी स्वरूपात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने 13 नोव्हेंबरला, उपांत्यफेरीतील सामने 15 नोव्हेंबरला तर अंतिम सामना 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे