September 13, 2024 8:38 PM

printer

पुरुषांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार

पुरुषांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. चीनमधल्या मोकी इथल्या मैदानावर होणारा हा सामना, या स्पर्धेतला भारताचा पाचवा सामना आहे. यापूर्वी भारतीय संघानं चीनला ३-०, जपानला ५-१, मलेशियाला ८-१ आणि कोरियाला ३-१ असं नमवलं आहे. गुणतालिकेत पहिलं स्थानी असलेल्या भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालंय. पाकिस्ताननं आतापर्यंत स्पर्धेतले २ सामने जिंकले असून २ बरोबरीत सोडवले आहेत. गुण तालिकेत पाकिस्तान दुसऱ्या स्थानी आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.