डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 13, 2025 8:06 PM | Award

printer

महेश बोभाटे स्मृती आणि आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कारांची घोषणा

क्रीडा पत्रकारितेत योगदान देणार्‍या पत्रकारांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिले जाणारे ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ आणि ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ यांची आज घोषणा करण्यात आली. २०२० ते २०२४ या कालावधीतील पाच वर्षांचे पुरस्कार यंदा एकत्रितपणे जाहीर करण्यात आले.

 

ज्येष्ठ पत्रकारांसाठी दिला जाणारा ‘महेश बोभाटे स्मृती पुरस्कार’ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र टाइम्सचे निवृत्त पत्रकार शरद कद्रेकर, संजय परब, एबीपी माझाचे विजय साळवी आणि दैनिक पुण्यनगरीचे सुभाष हरचेकर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह आणि १० हजार रुपये रोख असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या १९ तारखेला संध्याकाळी ६ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे. भारताचे माजी हॉकी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले, ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया विजू पेणकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.