नीती आयोगाने आज देशभरातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या १० हजारांपेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅबमधल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी मेगा टिंकरिंग डेचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात एकाच वेळी देशभरातल्या शाळांमधल्या साडे चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतल्या प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध असलेल्या दैनंदिन साहित्याचा वापर करून डू इट यूअरसेल्फ पद्धतीने व्हॅक्युम क्लिनर तयार करण्याच्या प्रकल्पात सहभाग घेतला. आकांक्षी जिल्ह्यातल्या दुर्गम गावांमधल्या शाळाही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
Site Admin | August 12, 2025 3:21 PM | Mega Tinkering Day
अटल टिंकरिंग लॅबमधल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी ‘मेगा टिंकरिंग डे’चं आयोजन