डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 7, 2024 6:59 PM | Maharashtra

printer

राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनाच्या कृती समितीची बैठक

राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनाच्या कृती समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने बैठक घेऊन उच्चाधिकार समितीने याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामंडळाचं उत्पन्न वाढावं यासाठी दोन हजार नवीन बसगाड्या घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

 

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावं, मागच्या वेतन वाढीतला फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम द्यावी आदी मागण्यांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवारही उपस्थित होते.