ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांच्या निवासस्थानी आज भेट झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात यावेळी चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. या भेटी दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी नसल्याने त्यांच्याशीही चर्चा करू, असंही पाटील म्हणाले.