एआय धोरण २०२५ च्या टास्कफोर्स समितीची पहिली बैठक संपन्न

एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित एआय धोरण २०२५ च्या टास्कफोर्स समितीची पहिली बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. या बैठकीची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. या बैठकीत अॅटलास स्किलटेक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर आणि मैत्री, एच डी एफ सी, गुगल, डेलॉईट, महिंद्र समूह, थिंक 360, क्यू एन यू लॅब्स, ब्रह्मा रिसर्च फाउंडेशन अशा संस्थांच्या तज्ञांशी संवाद साधल्याचं शेलार आपल्या संदेशात म्हणाले आहेत.  सर्वोत्तम शासकीय कार्यप्रणाली, महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार निर्मिती, AI आधारित उद्योग आणि स्टार्टअप्सचा विकास, नागरिकांचे सक्षमीकरण, शासकीय योजनांचा शेवटच्या घटकांपर्यंत लाभ आणि ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे जलद आणि कार्यक्षम सेवा वितरण करण्याबाबत टास्कफोर्स सदस्यांना सूचना केल्याचंही शेलार म्हणाले आहेत.