डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रताप्रकरणी वैद्यकीय पथक जबाबदार नाही – पी. टी. उषा

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महिला कुस्तीगीर विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्याप्रकरणी वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉ. दिनशॉ पारडीवाला यांना जबाबदार धरता येणार नाही असं भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी . उषा यांनी म्हटलं आहे. कुस्ती, मुष्टियुद्ध, आणि ज्युदो अशा क्रीडाप्रकारांमधे प्रत्येक खेळाडूच्या वजन, फिटनेस इत्यादीची काळजी त्यांच्या वैयक्तिक प्रशिक्षक पथकाने घ्यायची असते, असं त्यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.  डॉ. पारडीवाला यांची जबाबदारी खेळाडूला दुखापत झाल्यास त्यावर उपचार करुन सत्वर खेळायला तयार करण्यात मदत करण्याची आहे असं उषा यांनी स्पष्ट केलं.