डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन इथं, पोलिस दलातील पदक अलंकरण सोहळा संपन्न

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल राजभवन इथं, पोलिस दलातील पदक अलंकरण सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपतींनी 2021 आणि 2022 या दोन वर्षांच्या स्वातंत्र्य दिनी जाहीर केलेली पोलीस पदकं प्रदान केली. 41 पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस शौर्य पदकं, 3 पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, तर 39 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकं प्रदान करण्यात आली.