डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 13, 2025 3:47 PM

printer

राज्यात १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान गोवर-रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार

केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार राज्यात १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान गोवर-रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे.  पालघर जिल्ह्यातल्या सर्व आश्रमशाळांमधल्या ५ ते १५ वर्षे वयोगटातल्या बालकांना या लशीचा एक अतिरीक्त डोस दिला जाणार असून त्यासाठी स्वतंत्र सत्र आयोजित केलं जाणार आहे. गोवर आणि रुबेला या संसर्गावर विशिष्ट औषध उपलब्ध नसल्यानं लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय मानला जातो. 

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवासी आश्रमशाळा तसंच मदरशांमधे ही मोहीम राबवली जाणार आहे.