डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार वचनबद्ध-परराष्ट्र मंत्रालय

देशाचं राष्ट्रीय हित जपण्यासाठी तसंच सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान धोरणात्मक परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी, तसंच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यासाठी सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या या कराराच्या परिणामांचा अभ्यास केला जाईल, असं ते यावेळी म्हणाले. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री शाहबाज शरीफ यांच्यात  काल रियाधमध्ये या धोरणात्मक परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली.