जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या जी २० शिखरपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ३ दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले आर्थिक व्यवहार सचिव सुधाकर दलेला यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. हा त्यांचा चौथा दक्षिण आफ्रिका दौरा आहे. आफ्रिकेत पहिल्यांदाच जी २० शिखरपरिषद होत आहे. आपल्या दौऱ्यात ते भारत- ब्राइिल- दक्षिण आफ्रिका अर्थात इब्साच्या नेत्यांच्या बैठकीलाही प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत, असंं त्यांनी सांगितलं.
Site Admin | November 20, 2025 9:02 PM
G20 शिखरपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर