October 30, 2025 7:50 PM

printer

अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापारी कराराला अंतिम रूप देण्याबाबत बोलणी सुरु – MEA

अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापारी कराराला अंतिम रूप देण्याबाबत  बोलणी सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी आज दुपारी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. अमेरिकेनं रशियाच्या तेल कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधाच्या परिणामांचा तसंच जागतिक बाजारपेठेतल्या उलाढालींचा  अंदाज घेऊनच केंद्र सरकार याबाबत पावलं उचलणार असल्याचं जैस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केलं. पाकिस्तान-अफगाणिस्तान विवादाच्या पार्श्वभूमीवर भारत अफगाणिस्तानच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही जैस्वाल यांनी यावेळी दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.