माझी वसुंधरा अभियानाचा सहावा टप्पा राज्यात राबवला जाणार

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान सहावा टप्पा’ राबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या अभियानाअंतर्गत नोंदणी केलेल्या ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि २७ हजार ८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८ हजार ३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे.