डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यातल्या अनेक शहरांत कमाल तापमान चाळीशीपार

राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाच्या झळांमध्ये वाढ झाली असून अनेक ठिकाणी कमाल तापमानानं चाळीशी ओलांडली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोल्यात ४३ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मालेगांव, अहिल्यानगर, जळगांव तसंच मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं.
आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.