अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटन दौऱ्यावर-दोन्ही देशांमध्ये करार अपेक्षित

ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल सपत्निक ब्रिटन भेटीवर आले आहेत. अमेरिकेच्या ब्रिटनमधील मुख्य राजदूत मोनिका क्रॉली यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं.

 

ही भेट अत्यंत महत्वाची असून  ती ब्रिटिश राज घराणं आणि अमेरिका यांच्यातील उच्चस्तरीय संबंध दर्शवते असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सन्मानार्थ विंडसर कॅसलमध्ये, कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या भेटी दरम्यान, दोन्ही देशांमधील संबंधांचं नूतनीकरण करण्यासाठी गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी करण्यात येणार आहे.