December 16, 2025 3:16 PM | Mathura Accident

printer

मथुरा इथं झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू

 मथुरा इथं यमुना द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू झाला, तर ७० पेक्षा जास्त जण जखमी झाले. दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातानंतर वाहनांना मोठी आग लागली. प्रवासी झोपेत असल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. या दुर्घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.