अशियाई विकास बँकेचे ११वे अध्यक्ष म्हणून जपानचे अर्थमंत्री मसातो कानदा यांंची निवड

अशियाई विकास बँकेचे ११ वे अध्यक्ष म्हणून जपानचे अर्थमंत्री मसातो कानदा यांंची एकमताने निवड करण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांची निवड करण्यात आली. ते पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आपला पदभार स्विकारतील असंही बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. मसातो कानदा हे जपानच्या प्रधानमंत्र्यांचे विशेष आर्थिक सल्लागारही आहेत.