अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापुरात  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल संध्याकाळी चित्तमपल्ली यांचं वार्धक्यानं निधन झालं. ते ९४ व्या वर्षांचे होते. आज अक्कलकोट मार्गावरच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस दलानं बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. स्थानिक आमदार, वरीष्ठ सरकारी अधिकारी, तसंच साहित्यिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.