डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सागरी सुरक्षा ही भारत-आसियान सहभागाचा केंद्रबिंदू-संरक्षण मंत्री

आसियान संघटना आणि भारतानं वेगवान आर्थिक विकास केला असून सागरी सुरक्षा ही भारत-आसियान सहभागाचा केंद्रबिंदू असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. सागरी मार्ग सुरक्षित करणे हे देशाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगत भारताचा अर्ध्याहून अधिक व्यापार हा दक्षिण चीन समुद्र आणि मलाक्का सामुद्रधुनीतून जात असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण मंत्र्यांनी काल दुसऱ्या आसियान-भारत संरक्षण मंत्र्यांच्या अनौपचारिक बैठकीत भाग घेतला.

 

आजच्या अनिश्चित जगात, आसियान-भारत संबंध स्थिरतेचा एक मजबूत आधारस्तंभ आहेत असं या प्रसंगी बोलताना त्यांनी अधोरेखित केलं. दरम्यान राजनाथ सिंग आज मलेशियातील क्वालालंपूर इथे 12 व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.