मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांचं वितरण आज माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते होणार आहे. यात नरहर कुरूंदकर वाङ्मय पुरस्कार ‘अनोखे थायलंड’ प्रवास वर्णनासाठी वंदना पारगावकर यांना, म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार- ‘गांधी : वाद आणि वास्तव’ या पुस्तकासाठी सचिन कुसनाळे यांना, बी. रघुनाथ वाङ्मय पुरस्कार- पांडुरंग मुरारी यांच्या ‘नांगरमुठी’ या साहित्यकृतीला तर पुस्तक व्यवहारातील लक्षणीय कामगिरीसाठी रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगरच्या कैलाश पब्लिकेशन्सला प्रदान केला जाईल.
Site Admin | August 24, 2025 7:28 PM
मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांचं आज वितरण
