मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. ‘ऑपरेशन पोलो’ या लष्करी कारवाईद्वारे भारतीय सैन्याने हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन, भाषेच्या आधारे तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तिसंग्रामदिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होतो.
छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. विभागात इतर जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.