येत्या काळात ‘मराठवाडा’ सर्वात मोठं औद्योगिक हब असेल – मंत्री पीयूष गोयल

छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असून येत्या काळात मराठवाडा हे सर्वात मोठं औद्योगिक हब असेल, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथे वार्ताहरांशी बोलत होते. ऑरिक सिटीत जवळपास सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, याठिकाणी घरं, रुग्णालयं, विद्यापीठ यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. या औद्योगिक क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र तसंच स्टार्ट अप इन्क्यूबेशन हब बनवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.