डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणीला प्रारंभ

मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदारांनी येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदवण्याचं सांगण्यात आलं आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतदार यादी दर वेळी नव्यानं तयार करण्यात येते. त्यामुळं यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदार यादीत आपलं नाव असलं तरी ते रद्द होत असल्यानं  पुनर्नोंदणी गरजेची असल्याचं यंत्रणेतर्फे कळवण्यात आलं आहे. मतदार हा मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातला कोणत्याही वयाचा, कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि रहिवासी असावा. तर, एक नोव्हेंबर २०२२ पुर्वीचा तो पदवीधर असावा. तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतदार अर्ज जमा करता येतील.