मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात डॉ. अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉ. टेस्सी थॉमस यांची, तर डॉ. रा. वि. साठे जीवनगौरव पुरस्कारासाठी लस संशोधन कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉ. गगनदीप कांग यांची निवड झाली आहे.
प्रत्येकी २ लाख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार प्रदान समारंभ उद्या मुंबईत आयसीटी, अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेत होणार आहे.