डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त नवी दिल्लीत ग्रंथ दिंडीचं आयोजन

 

नवी दिल्लीत आजपासून ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा, ७१ वर्षानंतर हे संमेलन नवी दिल्लीत होतंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलंच संमेलन आहे. त्यानिमित्त सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यात विविध साहित्यिक, राजकारणी, साहित्य प्रेमी, चित्ररथ सहभागी झाले होते.

 

डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील. संध्याकाळी साडे ६ वाजता माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे उद्घाटन सत्र होईल. त्यात गेल्या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि या संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांचं भाषण होईल.

 

दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात, मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन, विविध विषयावर परिसंवाद, आदी कार्यक्रम होणार आहेत.राज्य सरकारनं या संमेलनाला एकूण ४ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा