डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी आंदोलन  सुरु असून  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले काही दिवसांपासून आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. तसंच धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारीही वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाचे काही नेत्यांनी पंढरपुरात  येऊन  धनगर समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या धनगर नेत्यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी धनगर एसटी आरक्षणाला आपला पाठिंबा याआधीच जाहीर केला आहे. 

 

नांदेडमधल्या सकल मराठा समाजाने आज  नांदेड बंदची हाक दिली आहे. नांदेड बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातल्या काही शाळाही बंद रहाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

 

अहमदनगर जिल्ह्यातल्या अखंड मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने  नगर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केलं आहे. 

 

वसमत इथे एका युवकाने आज आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आपली शेवटची इच्छा असल्याचं त्याने चिठ्ठीत लिहीलं असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.