डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 15, 2024 4:37 PM | Congress

printer

भाजपासह इतर पक्षातील अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपाचे माजी आमदार धृपदराव सावळे आणि अविनाश घाटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काल मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मनसेेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कमाल फारुखी, उमर फारुखी, वंचित बहुजन आघाडीचे रेहमान खान, माजी नगराध्यक्ष जम्मूसेठ यांचा यात समावेश आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.