फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणात हवा असलेल्या कुख्यात गुन्हेगार मुनवर खान याला कुवेतहून भारतात परत आणण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं आहे.
यात इंटरपोल, एनसीबी कुवेत आणि एमईएचं सहकार्य मिळाल्याचं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं म्हटलं आहे. कुवेत पोलिसांनी मुनवर खानला आज हैदराबाद विमानतळावर आणलं. २०११ ला बँक ऑफ बडोदाची फसवणूक करून तो फरार झाला होता.