डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कांस्यपदक जिंकत मनू भाकरनं केला भारताच्या पदक कमाईचा प्रारंभ

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज मनू भाकर हिनं आज इतिहास घडवला. महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात तिनं २२१ पूर्णांक ७ दशांश गुणांसह कांस्यपदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेतलं पहिलंवहिलं पदक भारताला मिळवून दिलं. १२ वर्षांनी भारताला नेमबाजीत पदक मिळालं आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी या यशाबद्दल मनू भाकरचं अभिनंदन केलं आहे. तिनं मिळवलेलं हे यश अनेक क्रीडापटूंना, विशेषतः महिलांना प्रेरणा देईल, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत. नेमबाजीत भारताला पदक मिळवून देणारी ती पहिली महिला असल्यानं हे यश आणखी खास असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.