डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरिस ऑलिम्पिक : नेमबाजीत मनु भाकर आणि सरबजोत सिंगच्या जोडीला कास्यपदक

पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारतीय नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिपिंकमधे १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र दुहेरी गटातं कांस्य पदक पटकावलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात एकाच क्रीडा प्रकारात एकाच ऑलिंपिकमधे दोन पदकं मिळवणारी मनु भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. सरबजोत सिंग याने त्याचं पहिलं ऑलिंपिक पदक पटकावलं आहे.

 

भारताच्या हॉकी संघाने आयर्लंडवर २-० अशी मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटन पुरुष दुहेरी मध्ये भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय टेबलटेनिसपटू मनिका बात्राने उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.