राज्य सरकारचं काम बँकांसाठी आश्वासक ठरत असून पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांनी नेहमीच सहकार्य केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची आढावा बैठक फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. सर्व बँकांकडून या महामंडळाला २५ हजार ८७५ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य प्राप्त झालं असल्याची माहिती त्यांनी दिली.