डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाणी प्रश्नी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याचं मंथन परिषदेतून आवाहन

छत्रपती संभाजीनगर इथं काल मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मासिआ, शेतकरी सहकारी पाणी वापर संस्था आणि साखर कारखान्यार्फे मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नावर मंथन परिषद पार पडली. खासदार संदीपान भुमरे, खासदार भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, जालन्याचे खासदार कल्याण काळे, आमदार राजेश टोपे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्यासाठी आणि विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व आमदार खासदारांनी पक्षीय मतभेद बाजुला ठेऊन एकत्र यावं, मराठवाड्याच्या हितासाठी जनआंदोलन उभं करणं गरजेचं असल्याचं मत या परिषदेत माडंण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.