देशातल्या सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकारमंत्र्यांची मंथन बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. सहकार क्षेत्रातल्या विविध उद्दिष्टांच्या पूर्ततेचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे.
जगातलं सर्वात मोठं धान्य गोदाम सहकारातून उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल. अन्न सुरक्षा, आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या मुद्यांच्या आधारे विविध राज्य राबवत असलेल्या उपाययोजनांचा आढावा तसंच शिफारशीही लक्षात घेण्यात येतील.