तरुणांमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयानं केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज एका खासगी कंपनीशी सामंजस्य करार केला. रोजगार निर्मिती हा बळकट आणि आत्मनिर्भर भारताचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ असल्याचं प्रतिपादन मांडवीय यांनी यावेळी केलं.
खासगी क्षेत्राशी भागीदारी केल्यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतीलच, शिवाय कृषी, सेवा आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांची प्रगती होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल यात महत्त्वाची भूमिका बजावत असून आत्तापर्यंत यात ५१ लाखांपेक्षा जास्त नोंदण्या झाल्याची माहितीही त्यांनी दिली.