डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्यामुळे पहलगाम हल्ला झाल्याचा आरोप करत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी अनेक गोष्टी नमूद केल्या, मात्र २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये हल्ला का आणि कसा झाला, याचं उत्तर मिळालं नाही, असं काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी नमूद केलं. पहलगाममध्ये इतके पर्यटक येतात, तिथं सुरक्षादलं का नव्हती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या हल्ल्यामागे असलेल्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेने २०२० ते २०२५ या काळात काश्मीरमध्ये २५ दहशतवादी हल्ले केले, मात्र भारत सरकारने या संघटनेचा समावेश दहशतवादी संघटनांच्या यादीत २०२३मध्ये केला, यामागची कारणं काय, असंही गांधी यांनी विचारलं.

 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर विभागाच्या अपयशाची आणि सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटींची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेदरम्यान उपस्थित केला. भारताची सशस्त्र दलं पाकिस्तानला कायमचा धडा शिकवू शकत होती, तेव्हा सरकारनं माघार का घेतली? असंही त्यांनी विचारलं. शस्त्रसंधीची घोषणा सरकारनं करण्याऐवजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली, असं सांगून त्यांनी सरकारवर टीका केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.